Dailyhunt
शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू.

शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू.

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे बोलेरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे.

निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात सोळांकुर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर झाले आहेत. शुभम चंद्रकांत धावरे (वय 28), आकाश आनंदा परीट (वय 23) आणि रोहन संभाजी लोहार (वय 24, सर्व रा. सोळंकूर) या तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ एका बुलेरो गाडीला ट्रकने मंगळावारी (ता. १०) मध्यरात्रीच्या सुमारास धडक दिली. या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार हे तीन युवक जागीच ठार झाले. तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता त्याने घटनास्थळावरुन पळ काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी…

वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…

Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

The post शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka