Dailyhunt
सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल.

सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल.

सोलापूर: पोलिस पत्नीने मुलांसोबत शेवटचा सेल्फी घेऊन टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्विनी सिलसिद्ध सलगर असे पोलिस पत्नीचे नाव आहे. पती रात्री डुटीवर असताना अश्विनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

बुधवारी पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार समोर आला. त्यानंतर पती कार्यरत असणाऱ्या पोलिस ठाण्यातच या घटनेची नोंद झाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेले सिलसिद्ध यांची पोलिस ठाण्यात नाईट ड्युटी होती. त्यामुळे ते पोलिस ठाण्यात गेले होते. घरामध्ये पत्नी अश्विनी व दोन मुले होती. मध्यरात्री अश्विनीने दोन्ही मुलं झोपलेली असताना त्यांच्यासोबत सेल्फी घेतला आणि जवळच राहत असलेल्या नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. नेहमीच अश्विनी अशी धमकी देत होती म्हणून नातेवाईकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अश्विनीचा मेसेज नातेवाईकांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पाहिला आणि तिच्या पतीला माहिती दिली. सिलसिद्ध यांनी अश्विनीला फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. घराजवळ राहत असलेल्या नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. मात्र, दरवाजा आतून बंद होता. काही वेळातच पोलिस पती सिलसिद्ध त्या ठिकाणी आले आणि दरवाजा तोडला. आतमध्ये पाहिले असता अश्विनीने साडीच्या साह्याने सिलिंगच्या लोखंडी कडेला गळफास घेतल्याचे पाहून धक्का बसला.

पती आणि इतरांनी खाली उतरून उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या पोलिस ठाण्यात अश्विनीचे पती कार्यरत आहेत, त्याच पोलिस ठाण्यामध्ये पत्नीने आत्महत्या केल्याची नोंद झाली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सोलापूर! टेम्पोच्या धडकेत दोन जिवलग मैत्रिणींचा मृत्यू…

सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…

सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…

सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…

सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka