Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास.

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास.

पुणेः पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात आंदेकर कुटुंबाचा रंक्तरंजीत इतिहास तब्ब्ल पाच दशकांचा आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

पुण्यातील नाना पेठेत निवांत उभ्या असलेल्या वनराज आंदेकरांची चार दुचाकींवरून आलेल्या मारेकऱ्यांनी अवघ्या दहा सेंकदात हत्या केली. वनराज आंदेकर यांच्या या हत्येला त्यांचा सख्ख्या बहिणींसोबतचा मालमत्तेचा वाद कारणीभूत ठरला. गेल्या काही महिन्यांपासून वनराज आंदेकर यांचे त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्यासोबत बिनसले होते. या हत्येनंतर पोलिसांनी संजीवनी, कल्याणी या दोन सक्ख्या बहिणी आणि जयंत आणि गणेश या त्यांच्या नवरायांसह सोमनाथ गायकवाड या प्रमुख आरोपींसह दहा जणांना अटक केली आहे.

आंदेकर कुटुंबाचा इतिहास?
– सत्तरच्या दशकात जुने कपडे घेऊन त्याबदल्यात भांडी विकणारं आंदेकर कुटुंब पुढे गुन्हेगारीकडं वळाले. जुगार, मटका, खंडणी अशा मार्गांनी या कुटुंबानं बस्तान बसवलं.
– बाळकृष्ण आंदेकर याने सुरु केलेल्या या टोळीतील प्रमोद माळवदकर वेगळा झाल्याने सत्तरच्या दशकात पुण्यात आंदेकर – माळवदकर टोळीयुद्धाची सुरुवात झाली. त्यातून आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकरच्या वडिलांची 1978 मध्ये हत्या केली. पुढे माळवदकर टोळीने बाळकृष्ण आंदेकरची 1984 ला हत्या केली. हत्या करून त्या हत्येचा बदला घेतला.
– बाळकृष्ण आंदेकरच्या हत्येनंतर या टोळीची सूत्रं त्याचा चुलतभाऊ सूर्यकांत आंदेकाराकडे आली.
– सूर्यकांत आंदेकरला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या टोळीयुद्धातून पुण्यात पुढे सहा हत्या झाल्या. त्यानंतर पुणे पोलिसांनी 1997 मध्ये प्रमोद माळवदकरचा एन्काउंटर केल्यावर हे टोळीयुद्ध शांत झाले होते.
– पुढे आंदेकर कुटुंबाने गुन्हेगारी बरोबरच राजकारणात प्रवेश केला आणि बाळकृष्ण आंदेकरची बहीण वत्सला आंदेकर या 1997 ला नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि 1998 ला सुरेश कलमाडी यांच्या पाठिंब्यावर पुण्याच्या महापौर बनल्या.
– जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सुर्यकांत आंदेकरांची पत्नी राजेश्री आंदेकर या देखील नगरसेविका बनल्या.
– आंदेकर कुटुंबातील रमाकांत, गणेश, उदयकांत आणि वनराज हे देखील नगरसेवक बनले.
– वनराज हा सुर्यकांत आणि राजेश्री यांचा मुलगा तर संजिवनी आणि कल्याणी या मुली. पण पुढे या सख्ख्या बहिण-भावामध्ये मालमत्ता आणि वर्चस्वातून वाद सुरु झाला. यातन जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे याच्यावर काही महिन्यांपूर्वी सुर्यकांत आंदेकरने हल्ला केला.
– सूर्यकांत आंदेकरवर त्यावेळी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली.
– राजकीय दबावामुळे सुर्यकांतला जामीन मिळाला. आणि जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाडने चिडून वनराज आंदेकरचा काटा काढायचे ठरवले आणि हत्या केली.

टोळीयुद्धाचा शेवट अखेर कुटुंबात झाला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली वनराजच्या सख्ख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी आणि दोन सख्खे मेहुणे जयंत आणि गणेश कोमकर यांना अटक करण्यात आली आहे. पण, गुन्हेगारीचा शेवट गुन्हेगारीनेच होतो हा इतिहास आहे. मागील तीन पिढ्या स्वतः आंदेकर कुटुंब या इतिहासाचा भाग राहिले आहे. टोळीयुद्ध अखेर त्यांच्या कुटुंबात सुरु झालं आणि सख्ख्या बहिणींकडून भावाची हत्या घडवण्यात आली.

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka