Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुनेने सासूच्या हत्येची दिली सुपारी; चिमुकलीमुळे हत्याकांडाचा उलगडा.

सुनेने सासूच्या हत्येची दिली सुपारी; चिमुकलीमुळे हत्याकांडाचा उलगडा.

नागपूर : संपत्तीच्या वादातून सुनेने सुपारी देऊन सासूला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेसह तिच्या दोन भावांना अटक केली आहे. सुनेनं चुलत भावांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती.

हत्येच्या ८ दिवसांनी हा सर्व प्रकार उघड झाला. पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीने दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला.

सुनिता राऊत (वय 54) असे मृत महिलेचे तर वैशाली राऊत (वय 32) असे आरोपी सुनेचे नाव आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर मृत सुनिता राऊत या सून वैशाली आणि पाच वर्षाच्या नातीसोबत राहत होत्या. 28 ऑगस्ट रोजी हार्ट अटॅक मुळे सुनिता यांचा मृत्यू झाल्याचा बनाव सून वैशालीने केला होता. त्याच दिवशी सुनीता राऊत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनिता राऊत यांच्या कुटुंबियांना मृत्यूबाबत संशय होता. त्यांनी मृतदेहाचे फोटोही काढून ठेवले होते. सुनिता यांच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला तेव्हा वैशालीच्या लहान मुलीने दिलेल्या माहितीमुळे सगळा पर्दाफाश झाला. वैशालीच्या पाच वर्षांच्या मुलीने दोन मामा घरात आले होते आणि त्यांनी सुनिता यांना मारल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी वैशालीच्या फोनचा डेटा तपासला. त्यात वैशालीने सुनिता यांच्या मृत्यूच्या आधी भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांना सतत फोन केल्याची माहिती समोर आली.

वैशाली हिचे दोन्ही भाऊ हे मध्य प्रदेशातील पांढुरणा येथे राहतात. मृत सुनिता या वैशालीच्या चरित्रावर संशय घेत होत्या. तसेच सासूचा काटा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल या विचारातून वैशालीने हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…

नागपूरमध्ये पती-पत्नीचा रस्त्यावरील नग्नावस्थेतील व्हीडिओ व्हायरल…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

नागपूर हादरलं! घरात तीन जणांचे मृतदेह पाहून शेजाऱ्यांना बसला धक्का…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka