पुणे : पुणे शहरातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी (ता. २८) कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपीचे वकील सूमित पोटे आणि अजिंक्य महाडीक यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.
पीडित युवती (वय २६) आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपो मध्ये झालेली होती. मी तिला कुठलीही बळजबरी केलेली नाही. ती स्वतः मला म्हटली, तेव्हा आम्ही बसमध्ये गेलो. साडेसात हजार रुपये युवतीने घेतले, असे दत्तात्रय गाडे याने आपल्या वकिलांना सांगितले आहे. त्याठिकाणी त्या युवतीचा एजंटही असल्याची माहिती गाडी याने आपल्या वकिलांना दिली. दोघांमध्ये पैशांचा वाद होता. त्यामुळे युवतीने आरोप केल्याचा दावा वकिलांनी केला आहे.
युवतीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे झाले ते दोघांच्या संमतीने झाले होते. दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल, असेही आरोपींच्या वकिलांनी म्हटले आहे. दत्ता गाडे हा पळून गेला नाही तर तो आपल्या गावी गेला. गावाला पोलिस छावणीचे स्वरुप आल्याने तो दडून बसला होता, अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली आहे.
तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी या घटनेविषयी सविस्तर माहिती कोर्टात न्यायाधीशांपुढे मांडली आहे. 25 फेब्रुवारीला स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली आहे. त्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेतील फिर्यादी मूळगावी जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडवर आल्या होत्या. अचानक एक व्यक्ती या पीडित युवतीच्या जवळ आला, त्याने तिला विचारलं ताई कुठं जायचं आहे. कंडक्टर म्हणून फिर्यादीला बोलत होता, ताई म्हणून विश्वास संपादन करत होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
फिर्यादीला बस आरोपीने दाखवली होती. बसमध्ये अनेक लोक असल्याचे त्याने सांगितले होते. पण, बस पूर्ण रिकामी होती. फिर्यादीने बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, युवतीने आरोपीला विनंतीही केली, मला बाहेर सोडा. पण आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्याने पीडितेला मारहाण करुन दोन वेळा लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचार करून तो पळून गेला होता. त्यानंतर मित्राच्या सांगण्यावरून फिर्यादीने तक्रार दिली आणि पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले आहे. दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे. आरोपी अत्यंत सराईत आहे. तो मोबाईल बंद करून फिरत होता. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत, अशी माहिती तपास अधिकारी युवराज नांद्रे यांनी दिली आहे.
दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा मोठा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले, ‘या घटनेनंतर बसमधून दोघे व्यवस्थित बाहेर आले. नंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली. हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. सीसीटीव्हीत ती मुलगी स्वतःहून बसमध्ये चढली व त्यापाठीमागे आरोपी चढला असे सांगत घटनेवर प्रश्वचिव्ह निर्माण केले. तसेच सहमतीने संबंध झाल्याचे आरोपीच्या वकिलांनी सांगितले. आरोपीचा टीव्हीवर चेहरा दाखवल्याने टी /आय पीरेड चा प्रश्न राहत नाही. आरोपीवर असलेले गुन्हे सिद्ध नाहीत. त्यामुळे सराईत म्हणता येणार नाही. त्यामुळे दोन दिवसांची कोठडी पुरेशी असताना 14 दिवस कोठडीची आवश्यकता नाही. असा युक्तीवाद करत आरोपीच्या वकिलांनी विरोध केला होता.
आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…
पुणे पोलिस आयुक्तांनी आरोपी दत्ता गाडे बाबत दिली महत्तावाची माहिती; आत्महत्येचा प्रयत्न…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मिळाले लोकेशन…
पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…
स्वारगेटच्या बसस्थानकात कंडोम, चादरी अन् दारुच्या बाटल्या…
पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…
The post स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

