मुंबई: पोलिस आणि सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर 20 नोव्हेंबर रोजी असल्याने त्यांना मतदान करणे शक्य नसते. या पार्श्वभूमीवर टपाली मतदानाद्वारे पोलिसांना मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.
टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टपाली मतदानाचा फोटो गावाकडे व्हॉट्सअॅप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शिवडी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्या विरोधात कलम 223 सह लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 128 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाझ पठाण (मुळ रा. कोरेगाव, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. सदर पोलिस कर्मचारी शिवडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
14 नोव्हेंबर रोजी 257 कोरेगांव विधानसभा मतदार संघ सातारासाठी पोलिस कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान घेण्यात आले. यावेळी टपली मतदान केल्यानंतर पोलिस कर्मचारी रियाझ याने मतपत्रिकेचा फोटो काढून गावी नातेवाईक आणि मित्र परिवाराला पाठवला. या व्हायरल झालेल्या टपाली मतपत्रिकेची चौकशी केल्यानंतर ही टपाली मतपत्रिका 184 भायखळा विधानसभा पोस्टल बॅलेट फॅसिलिटेशन सेंटर येथून प्राप्त झाल्याचे समोर आले. पुढील तपासात मिळालेल्या माहितीनुसार हा अर्ज मुंबई मतदार यादी क्रमांक 47 मधील या पोलिस कर्मचाऱ्याला देण्यात आला होता. पोलिस चौकशीत संबधित पोलिस कर्मचाऱ्याने गुन्ह्याची कबूली दिली. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी गावदेवी पोलिस ठाण्यातही अशाच प्रकारे टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी एका पोलिस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान महादेवाने राक्षस त्रिपुराचा केलेला वध हा एक प्रकारचा एन्काऊंटरचः अशोक इंदलकर
Video: एका दुचाकीवर बसले चक्क 8 जण; पोलिस अधिकारी राहिला मोजत…
नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर! पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला…
पोलिसांची मोठी कारवाई; 4,00,00,000 ही रक्कम कोणाची…
पोलिसांनी जप्त केले मोठे घबाड; रक्कम नेमकी कशासाठी…
The post टपाली मतदान करताना फोटो काढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

