Dailyhunt
पोलिसांची मोठी कारवाई; 4,00,00,000 ही रक्कम कोणाची.

पोलिसांची मोठी कारवाई; 4,00,00,000 ही रक्कम कोणाची.

पालघर : वाडा पोलिसांनी 3 कोटी 70 लाख 50 हजार रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम एटीएममध्ये जमा करण्यासाठी होती की निवडणुकीच्या प्रचारासाठी या पैशाचा वापर होणार होता, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भरारी पथकाकडून मुद्देमाल जप्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. निवडणुक आचार संहिता पथकातील वाडा पोलिसांनी एटीएम व्हॅनमधून 3 कोटी 70 लाख 50 हजार रुपयाची रोख रक्कम जप्त केली आहे. वाडा पोलिसांनी पाली येथील तपासणी नाक्यावर ही कारवाई केली आहे.

वाड्यावरून एटीएम व्हॅन विक्रमगडच्या दिशेने निघाली असताना वाडा पोलिसांनी संध्याकाळी 5 च्या सुमारास एटीएम व्हॅन अडवून त्याची तपासणी केली. या तपासणी दरम्यान एटीएममधील क्युआर कोड आणि रोख रक्कमेबाबत वाहन चालक आणि सुरक्षारक्षकाला माहिती देता आली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी एटीएम व्हॅनसह 3 कोटी 70 लाख 50 हजार रुपये जप्त करून वाडा पोलिस कार्यालयात आणली आहे. याबाबतचा अहवाल निवडणुक निर्णय अधिकारी यांना पाठवण्यात आला आला असून, याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरिक्षक दत्तात्रेय केंद्रे सहित पथक करीत आहे.

दरम्यान, नालासोपारा आणि विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत बॅंकांच्या एटीएममध्ये कॅश वाहून नेणाऱ्या कॅश वॅन मध्ये करोडोंची रोख रक्कम सापड्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नालासापोऱ्याच्या पश्चिमेत कॅश व्हॅनमध्ये 3 कोटी ४ लाखाची रक्कम सापडली आहे. तर विरारच्या मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ कोटी ८० लाख ऐवढी रोख रक्कम कॅश वॅन मध्ये सापडली आहे. स्थानिक भरारी पथकाने या व्हॅन अडवून पोलिसांच्या हवाली केल्या आहेत.

मुंबईत 1 कोटी 11 लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त; धक्कादायक माहिती समोर…

पोलिसांनी जप्त केले मोठे घबाड; रक्कम नेमकी कशासाठी…

पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…

पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…

पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…

पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश; पाहा 58 नावे…

संजय वर्मा राज्याचे नवे पोलिस महासंचालक…

The post पोलिसांची मोठी कारवाई; 4,00,00,000 ही रक्कम कोणाची… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka