Dailyhunt
टेनिसपटू राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर.

टेनिसपटू राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर.

चंदीगड (हरियाणा): गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादव (वय २५) हिच्या हत्येप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. आरोपी वडील दीपक यादव यांनी त्यांच्या मुलीच्या हत्येची पूर्णपणे योजना आखली होती.

हे रागाच्या भरात अचानक उचललेले पाऊल नव्हते. गोळीबार होण्यापूर्वी अनेक आठवडे वडील आणि मुलीमध्ये अनेक वाद झाले होते, त्याची आम्ही चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यादव (वय ५१) यांनी गुरुवारी (ता. 10) सकाळी 10:30 वाजता त्यांची मुलगी राधिका यादव हिच्या पाठीत चार गोळ्या झाडल्या. राधिका त्यांच्या तीन मजली घराच्या स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना वडील दीपक यादवने मुलीवरती गोळ्या झाडल्या आहेत. आरोपी दीपक यादवने कबूल केले आहे की, त्याने राधिकाला मारण्यापूर्वी संपूर्ण नियोजन केले होते. सहसा तो सकाळी स्वतः दूध आणायला जायचा, पण गुरुवारी त्याने त्याच्या मुलाला पाठवले. यानंतर, जेव्हा तो राधिकासोबत घरात एकटाच होता, तेव्हा ती नाश्ता बनवत असताना त्याने तिच्यावर चार गोळ्या झाडल्या."

दीपकच्या मूळ गावी वजीराबाद येथील एका जुन्या शेजाऱ्यानेही असा दावा केला की, दीपक राधिकाच्या जीवनसाथीच्या निवडीमुळे नाराज होता. राधिकाला तिच्या जातीबाहेर लग्न करायचे होते, परंतु तिच्या वडिलांना तिने तिच्या जातीत लग्न करावे असे वाटत होते. एका उच्चशिक्षित कुटुंबात एका धक्कादायक घटनेने सगळ्यांना हादरवून टाकले आहे.

राधिका ही बालपणापासून टेनिसमध्ये चांगली जादू दाखवत होती. तिच्या प्रशिक्षणासाठी वडिलांनी सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी तिला दुखापत झाल्याने तिचा स्पर्धात्मक करिअर थांबला. त्यानंतर तिने टेनिस कोचिंग सुरू केली आणि सोशल मीडियावरही इन्फ्लुएंसर म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिस चौकशीत दीपक यादव यांनी कबूल केलं की, गावातील लोकांचे सततचे टोमणे, मुलीच्या वर्तनावर टीका यामुळे तो मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाला होता. त्याला झोप लागत नव्हती आणि तो घरात एकटा बसून रागात असायचा. विशेषतः मुलीचे सोशल मीडियावरचे व्हिडीओ, कोचिंग सेंटर सुरू ठेवणे यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्यामुळे त्याने राधिकावर सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्याचा दबाव टाकला होता, आणि काही वेळात तिने ते बंदही केले. पण राधिका आपल्या कोचिंगबाबत ठाम होती.

सांगलीत थरार! दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने चिरला गळा…

टेनिसपटू राधिका यादव हिची वडिलांनीच केली निर्घृण हत्या; कारण…

माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…

पुणे! मैत्रिणीला दिवस गेल्याचे कळल्यानंतर रबडीतून दिली गोळी अन् अनेकींसोबत संबंध…

सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारमुळे एकाचा जागीच मृत्यू; आता स्पष्टीकरण…

The post टेनिसपटू राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka