Dailyhunt
टेनिसपटू राधिका यादव हिची वडिलांनीच केली निर्घृण हत्या; कारण.

टेनिसपटू राधिका यादव हिची वडिलांनीच केली निर्घृण हत्या; कारण.

चंदीगड (हरियाणा): भारतीय टेनिसची उदयोन्मुख खेळाडू राधिका यादव (वय २५) हिची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी राधिका यादव हिच्या वडिलांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

टेनिस खेळाडू राधिका यादव तिच्या कुटुंबासह येथील सेक्टर 57 मधील पहिल्या मजल्यावर राहत होती. गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास तीन वेळा गोळ्या झाडल्यानंतर, राधिकाला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोशल मीडियावर रील बनवल्याबद्दल वडील राधिकावर रागावले होते. ज्यामुळे तिला गोळ्या झाडून मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

राधिका ही एक प्रसिद्ध राज्यस्तरीय खेळाडू होती. तिने अनेक पदके जिंकली होती. ती एक टेनिस अकादमी देखील चालवत होती, जिथे ती इतर मुलांना टेनिस शिकवत होती. गुरुग्राम सेक्टर 56 च्या पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'गुरुवारी सकाळी माहिती मिळाली की एका युवतीची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळीच पोलिसांना कळले की मुलीच्या वडिलांनी तिला गोळी मारली आहे. महिलेला तीन गोळ्या लागल्या होत्या. पोलिसांनी हत्येत वापरलेले रिव्हॉल्व्हर जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे.'

माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…

पुणे! मैत्रिणीला दिवस गेल्याचे कळल्यानंतर रबडीतून दिली गोळी अन् अनेकींसोबत संबंध…

लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारमुळे एकाचा जागीच मृत्यू; आता स्पष्टीकरण…

The post टेनिसपटू राधिका यादव हिची वडिलांनीच केली निर्घृण हत्या; कारण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka