Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न.

वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न.

सांगली : पत्नीने वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना कुपवाड येथील प्रकाशनगरच्या एकता कॉलनीत घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अनिल लोखंडे असे मृत पतीचे नाव आहे. अनिल लोखंडे यांची राधिका ही दुसरी पत्नी असून लग्नाला अवघे १७ दिवसच झाले होते. अनिल लोखंडे यांची पहिली पत्नीचे निधन झाले आहे. अनिल लोखंडे यांना दोन मुली असून त्यांचे लग्न झाले आहे. अनिलचे जेवणाचे हाल होत असल्याने नातेवाईकांनी दुसरा विवाह केला. मात्र वटपौर्णिमेच्या रात्री राधिकाने कुऱ्हाडीने डोक्यावर आणि हातावर वार केला. त्यात अनिल यांचा जागीच मृत्यू झाला. कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतले आहे.

लग्न झाल्यापासून अनिल पत्नी राधिकाशी सतत जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. पण राधिकाला ते आवडत नव्हते. त्याच कारणातून चिडून तिने पती अनिल याचा खून केला. संशयित पत्नी राधिका हिला अटक केली. अनिल लोखंडे यांच्या खुनाचं आणखी वेगळे काही कारण आहे का याचाही तपास पोलिस करत आहेत. कारण दोघांच्या लग्नाला अवघे 17 दिवस झाले होते.

सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

धक्कादायक! पतीच्या हत्येनंतर सोनमने घालवली प्रियकरासोबत रात्र…

महाराष्ट्र हादरला! डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून बनविले अश्लिल व्हिडिओ…

नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…

धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

The post वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka