जयपूर (राजस्थान): जयपूरमध्ये शनिवारी (ता. १२) सोडाला भागातील एलिव्हेटेड रोडवर चालणाऱ्या एका कारला अचानक आग लागली. आगीमुळे गाडीचा हँडब्रेक निकामी झाला, त्यामुळे आगीने वेढलेली कार एलिव्हेटेड रोडवरून खाली उतरू लागली.
जळत्या कारचा हा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून आणि सोशल मीडियावर शेअर केला. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. ज्यामध्ये जयपूरमधील अजमेर रोडवरील सुदर्शनपुरा पुलियाकडे जाणाऱ्या एलिव्हेटेड रोडवर चालकविरहित कारला आग लागल्याचे दिसून येते. जळत्या कारला आपल्याकडे आल्याचे पाहून रस्त्यावरील सर्व लोक आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळू लागले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार जितेंद्र जांगीड हे चालवत होते. जितेंद्र एलिव्हेटेड रोडवरून खाली येत असताना कारच्या एअर कंडिशनिंग युनिटमधून धूर निघताना दिसला. गाडीतून उतरून बोनेट उचलताना जितेंद्रला इंजिनला आग लागल्याचे दिसले. यामुळे ते बाजूला झाले. आगीमुळे गाडीचा हँडब्रेक निकामी झाल्यामुळे आगीने वेढलेली कार एलिव्हेटेड रोडवरून खाली उतरू लागली.’
अग्निशमन विभागाचे अधिकारी दिनेश कुमार यांनी सांगितले की, ‘एक टीम घटनास्थळी पाठवून आग आटोक्यात आणली, मात्र कार आणि त्यात ठेवलेले मौल्यवान साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.’ घटनेचा व्हायरल व्हिडिओ @gauravbarar25 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
Video : मुलाच्या हातातून मोबाईल घेतला अन् त्याने आईच्या डोक्यात घातली बॅट…
Video: पोलिसकाकाने 'ऑन द स्पॉट' लावला चोरट्यांचा निकाल…
Video: एका बोगस आयपीएस अधिकाऱ्याची रंगली जोरदार चर्चा…
Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…
Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…
The post Video: विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर लागली धावू अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

