Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू.

Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू.

पुणे : पुणे शहरातील हिंजवडी परिसरात सिमेंट मिक्सरने दोन आयटी इंजिनियर युवतींना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत.

हिंजवडी भागात मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (ता. २४) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. हिंजवडीत भरधाव जाणारा डंपर (रेडीमिक्स) वळण घेत असताना अचानक पलटी झाला आणि त्याखाली चिरडून शेजारून दुचाकीवरून चाललेल्या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. हिंजवडी-माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ ही घटना घडली.

हिंजवडीतील अपघातात प्रांजली महेश यादव (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. भरधाव डंपर दोन युवतींच्या अंगावर आला, त्या वेळी तेथून एक युवकही दुचाकीवरून चालला होता. मात्र, डंपर उलटत असल्याचे पाहताच त्याने दुचाकी सोडून पळ काढला आणि तो थोडक्यात बचावला. विद्यार्थिनींना उडवणाऱ्या रेडीमिक्स डंपरच्या चालकाने दारू प्यायली होती. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या डंपरमुळे रस्त्यावर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. डंपरला रस्त्यावरुन हटवण्यात आल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील नवले पुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; पाहा जखमींची नावे…

Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…

भीषण अपघाताचा लक्ष विचलीत करणारा Video; पाच जागीच ठार…

पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…

The post Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka