Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार.

Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार.

न्यूयॉर्क: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान हवेत असताना, या विमानाला सैन्याचे हेलिकॉप्टर धडकले आहे. अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

संबंधित अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

विमान आणि हेलिकॉप्टर अपघातानंतर नदीत कोसळून पडले आहेत. अपघातग्रस्त झालेलं प्रवासी विमान रीगन विमानतळावर लँड करत होते, याचवेळी समोरून अमेरिकन सैन्यांचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आले. या दोघांची हवेतच धडक झाली. ज्या हेलिकॉप्टरशी विमानाची धडक झाली ते सिरोस्की एच-60 प्रकारचं हेलिकॉप्टर होते. ज्या विमानाला अपघात झाला, ते एक लहान आकाराचे प्रवासी विमान होते. यात 65 लोक बसू शकत होते. अपघातावेळी विमानात 60 प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. हे विमान कॅन्ससहून वॉशिंग्टनला येत होते.

एअरलाइन कंपनीने एक निवेदन जारी करत अपघाताची पुष्टी केली आहे. PSA द्वारे चालवले जाणारे अमेरिकन ईगल फ्लाइट 5342 कॅन्ससहून वॉशिंग्टनच्या रीगन विमानतळावर येत होते. ज्याचा अपघात झाला आहे. अमेरिकन सिनेटर टेड क्रूझ म्हणाले, विमान आणि हेलिकॉप्टर अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र विमानात किती लोक होते, याची अधिकृत माहिती आम्हाला अद्याप मिळाली नाही. या अपघातानंतर रीगन विमानतळावरची विमानसेवा रोखण्यात आली आहे. या विमान अपघातानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवेदन जारी करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. निवेदनातून त्यांनी रीगन विमानतळावर झालेल्या अपघाताची माहिती दिली असून मृत प्रवाशांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत, असेही निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या विमानतळावर सर्व उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे. दोन्हींचे अवशेष सध्या पोटोमॅक नदीत आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बचावकार्य सुरू आहे.

भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

प्रसिद्ध अभिनेत्याचा 2 लहान मुलींसह विमान अपघातात मृत्यू…

भारतीय अब्जाधीश उद्योगपतीसह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू…

Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…

Video: भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोसळले, दोन पायलटचा मृत्यू…

The post Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka