Dailyhunt
Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू.

Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू.

मॉस्कोः रशियन लष्करी विमान आज (मंगळवार) कोसळले असून, या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

रशियन लष्कराचे IL-76 विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळले. या विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून फुटेजमध्ये क्रॅश साइटवरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघाताच्या वेळी विमानात 15 जण होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर इल्युशिन IL-76 हे लष्करी मालवाहू विमान क्रॅश झाले. अपघाताच्या वेळी विमानात 15 जण होते. सर्वांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, रशियन सोशल मीडिया या विमान अपघातासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विमान जळत्या इंजिनसह खाली कोसळताना दिसत आहे. विमान खाली कोसळत असताना धुराचे प्रचंड लोट आकाशात उठताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्याचा 2 लहान मुलींसह विमान अपघातात मृत्यू…

स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

Video: भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोसळले, दोन पायलटचा मृत्यू…

Video: सर्कसमधील अपघात पाहून पोटात येईल गोळा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka