Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू.

हृदयद्रावक! कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू.

कोल्हापूर : अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आजरा तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सागर सुरेश करमळकर (वय 32) व सुषमा सागर करमळकर (वय 26) असे मृत्युमुखी पडलेल्या नवदांपत्यांची नावे आहेत. महिनाभरापूर्वी विवाह झालेले करमळकर दाम्पत्य हे फिरण्यासाठी आंबोली येथे रविवारी दुपारच्या दरम्यान गेले होते. आंबोलीहून परतल्यानंतर त्यांच्या भावेश्वरी कॉलनी येथील घरामध्ये असताना त्यांचा फोन उचलला जात नव्हता. यामुळे मित्रांनी सोमवारी सकाळी त्यांच्या घरी भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता गॅस गिझरचा गॅस लिकेज होऊन बाथरूममध्येच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

घरामध्ये सर्वत्र गॅसचा वास होता. त्यामुळे गॅस लिकेजनेच सदर मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होती. मोठा मित्रपरिवार असणाऱ्या सागरच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई व भाऊ असा परिवार आहे.

धक्कादायक! गावातील युवतीसोबत प्रेमविवाह अन् ऑनलाईन रम्मीचा लागला नाद…

हृदयद्रावक! इंद्रायणी अपघातात 'फादर्स डे'लाच वडील आणि मुलाने गमावला जीव…

हृदयद्रावक! डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच एअर होस्टेस रोशनीने घेतला जगाचा निरोप…

कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न…

The post हृदयद्रावक! कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka