लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूरमध्ये उपसंचालकाने निवृत्त अभियंत्याशी वाद घालत दाताने चावा घेत अभियंत्याच्या नाकाचा शेंडा तोडल्याची घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
उपसंचालकानं दाताने चावा घेत अभियंत्याचा नाकाचा शेंडा कापला. एवढ्या जोरात चावा घेतला की नाकाचा तुकडा बाजूला पडला. नाकातील रक्तस्त्राव पाहून अभियंत्याच्या मुलाने त्यांना रुग्णालयात नेले. मुलाने सांगितले की, त्याने त्याच्या वडिलांवर उपचार करून घरी आणले आहे. ते बोलू शकत नाहीत. एक-दोन दिवसांत दिल्लीला नेले जाईल. जिथे नाकाची प्लास्टिक सर्जरी केली जाईल.

