Dailyhunt
Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी.

Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी.

पुणेः महाराष्ट्राचे सुपूत्र आणि IPS विनायक भोसले यांनी आग्रा (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या दबंग कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या कामगिरीचे उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.

आग्रा येथील हरी पर्वत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या सरकारी नर्सिंग होममधील एक टाईल्स तुटली होती. संबंधित टाईल्सवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र होते. यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घालण्यास सुरवात केली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. IPS विनायक भोसले हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यकर्त्यांनी गोंधळ घालतानाच पोलिस कर्मचाऱ्याची वर्दी फाडली.

पोलिस कर्मचाऱ्याची वर्दी फाडल्याचे लक्षात आल्यानंतर IPS विनायक भोसले यांना राग अनावर झाला. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे त्यांनी आदेश दिले. यानंतर अनेकांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन IPS विनायक भोसले यांनी दिल्यानंतर परिस्थिती शांत झाली.

दरम्यान, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पाठिशी IPS विनायक भोसले यांच्यासारखा दबंग अधिकारी उभा राहिल्यानंतर पोलिसदलाबरोबरच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून IPS विनायक भोसले यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. शिवाय, IPS विनायक भोसले हे आपल्या कामातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देत असल्यामुळे काही दिवसांतच ते चर्चेत आले आहेत.

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

नाशिक शहर पोलिस :

The post Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka