Dailyhunt
Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्.

Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्.

मुंबई: उरणमधील यशश्री शेख हत्याकांड प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 30 जुलैला दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली असून, पोलिस दाऊदची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

दाऊद शेख याला अटक केल्यापासून पोलिस त्याचा आणि यशश्रीचा मोबाईल कुठे आहे, याचा शोध घेत होते. मात्र, दाऊद शेख याने हे दोन्ही फोन फॉरमॅट केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे दाऊदने या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी गुरुवारी (ता. १) दाऊद शेखला यशश्री शिंदे हिची हत्या केली त्या घटनास्थळी नेले होते. दाऊदने यशश्रीची हत्या कशी केली याबाबत पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. मात्र, या तपासात दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांचा मोबाईल फोन महत्त्वपूर्ण पुरावा ठरण्याची शक्यता होती. दाऊदकडे यशश्रीचे काही आक्षेपार्ह फोटो होते. हे फोटो दाखवून तो यशश्रीला ब्लॅकमेल करत होता, असे सांगितले जाते. या दोघांनी मोबाईलवर एकमेकांना मेसेज पाठवले होते, अनेकदा त्यांचे संभाषणही झाले होते. त्यामुळे या तपासात दाऊद आणि यशश्री शिंदे दोघांचे मोबाईल फोन पोलिस तपासातील महत्त्वपूर्ण दुवा ठरु शकला असता.

यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…

दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…

Video: यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलिसांनी सांगितले…

यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…

The post Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka