नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक परदेशी महिला सुरक्षा तपासणीदरम्यान अडकली आहे. सीआयएसएफ महिला सुरक्षा अधिकाऱ्याचा हात परदेशी महिलेच्या कमरेच्या खाली येताच, हँड हेल्ड मेटल डिटेक्टर (एचएचएमडी) चा अलार्म जोराने वाजू लागला आणि चोरी उघड झाली.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
महिलेची तपासणी करत असतानाच बीपचा आवाज आला. महिला सीआयएसएफच्या महिला अधिकाऱ्याने विचारल्यानंतर सुरवातीला काही नसल्याचे सांगितले. तपासादरम्यान महिलेच्या अंडरगारमेंटमधून सुमारे 400 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले असून त्यात गोल्ड बार आणि दागिन्यांचा समावेश आहे. अमेरिकन महिलेच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत अंदाजे 35 लाख रुपये आहे. विदेशी महिलेच्या ताब्यातून सोनं जप्त केल्यानंतर ते कस्टमच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचबरोबर कस्टमने या विदेशी महिलेविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
सीआयएसएफचे सहाय्यक महानिरीक्षक अखिलेश कुमार शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सोन्यासह ताब्यात घेतलेल्या विदेशी महिलेचं नाव फराह डिको मोहम्मद असे आहे. नैरोबीहून येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-962 या विमानाने ती आयजीआय विमानतळावर पोहोचली होती. IGI विमानतळावरून तिला एअर इंडियाच्या विमान AI-560 ने हैदराबादला जायचे होते. मात्र, त्यापूर्वीच ती अडकली आहे.’
नागपूरच्या विमानतळावरून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त…
पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post विमानतळावर तपासणी करतानाच परदेशी महिलेच्या अंडरगारमेंटमध्ये… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

