Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nashik: त्र्यंबकेश्वर नगरपालिकेपाठोपाठ 16 ग्रामपंचायतीही महापालिका डेपोत कचरा टाकणार

Nashik: त्र्यंबकेश्वर नगरपालिकेपाठोपाठ 16 ग्रामपंचायतीही महापालिका डेपोत कचरा टाकणार

garbage depot, landfill

नाशिक (Nashik): त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचा कचरा एक मार्चपासून नाशिक महापालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यास परवानगी दिल्यानंतर आता नाशिक व इगतपुरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींकडे संकलित होणारा कचरा नाशिक महापालिकेच्या विल्होळी भागातील कचराडेपोत टाकला जाणार आहे.

यामुळे नाशिक व इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या कचऱ्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.

Maharashtra Economy: 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर

या ग्रामपंचायतींचा कचरा महापालिकेच्या विल्होळी येथील कचरा डेपोत पाठविण्यास महापालिकेने परवानगी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हा निर्णय घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे २०२७मध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने मागील सिंहस्थात प्रलंबित राहिलेला कचराडेपोचा मुद्दा यावेळी निकाली काढण्याचा निर्णय कुंभमेळा प्राधिकरणने घेतला आहे. त्र्यंबकेश्वर पालिकेने तळवाडे येथे सहा एकरवर कचरा डेपो प्रस्तावित केला आहे. मात्र, जागा मालक जागा देण्यास विरोध करीत आहेत. यामुळे जवळपास दहा-बारा वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. आता सिंहस्थापूर्वी कचरा डेपो प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. याबाबत जागा मालकांशी बोलणी सुरू आहे.

Nashik Ring Road बाबत काय ठरलं? महापालिकेने काय घेतला निर्णय?

दरम्यान जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने त्र्यंबकेश्वर पालिकेत संकलित होणारा कचरा नाशिक महापालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. हा कचरा केवळ महिनाभर म्हणजे मार्च २०२६ पर्यंत टाकण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. तोपर्यंत त्र्यंबकेश्वर पालिकेला त्यांची पर्यायी सोय करावी लागणार आहे.

याच पद्धतीने नाशिक व इगतपुरी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा संकलन केलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्यात प्रामुख्याने घोटी ग्रामपंचायत मुंबई आग्रा महामार्गालगत कचरा टाकते. त्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने महामार्गालगत कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत.

कुंभमेळा जवळ आला असून हा कचरा हटवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाला मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिल्या आहेत. मात्र, घोटी ग्रामपंचायतीकडे पर्यायी जागा नसल्याने ते कचऱ्याचे ढिगारे उपसून नाशिक महापालिकेच्या कचरा डेपोत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशीच परिस्थिती नाशिक शहरापासून जवळ असलेल्या गावांमधे निर्माण झाली आहे. तेथे संकलित कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसी जागा उपलब्ध नाही. जागा असली तरी प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री व व्यवस्था नसल्यामुळे या कचऱ्याचे ढिग साचलेले दिसतात. पावसाळात त्यातून दुर्गंधी पसरते. रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे.

Nashik: रोखीने टोल भारण्यास एक एप्रिलपासून बंदी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांना विनंती करत शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा कचरा घेण्याची विनंती केली. ग्रामपंचायती स्वत: हा कचरा विल्होळी येथील कचरा डेपोपर्यंत पोहोच करतील. तसेच प्रक्रिया शुल्कही त्यांना महापालिकेला अदा करावे लागेल.

याची पूर्वकल्पना दिलेल्या ग्रामपंचायतींनी या अटी मान्य करत कचरा पाठविण्यास तयारी दर्शविली आहे. फक्त आठवड्यातून किती दिवस हा कचरा पाठवायचा त्याचे नियोजन अद्याप अंतिम झालेले नाही. मात्र, कचरा पाठवण्यासाठी त्यांनी तयारी दर्शविल्याने ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यात नाशिक तालुक्यातील दहा आणि इगतपुरीच्या सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या ग्रामपंचायती समावेश

  • इगतपुरी : घोटी, गोंदे, वाडीवर्हे, मुंढेगाव, साकूर, टाकेद

  • नाशिक : विल्होळी, गोवर्धन, महादेवपूर, चांदशी, सारुळ, जलालपूर, राजूर बहुला, पिंपळद, पिंप्री सय्यद व पळसे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama