Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई.

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई.

पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या लोणावळा आणि परिसरात धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. वेळेचे बंधन न पाळणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर त्यांनी कारवाई केली आहे.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.यांचेकरिता प्रशासनाने वेळेचे बंधन घालुन दिलेले असतानाही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती श्री. कार्तिक यांना प्राप्त झाली होती. त्याची खातरजमा करण्याकामी सत्यसाई कार्तिक हे १०/०८/२०२४ रोजी मध्यरात्री त्यांचे पथकासह नमूद माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले होते.

कामशेत येथील १) दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील २) फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन्ही ठिकाणी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचे ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारूची विक्री करताना मिळून आल्याने नमूद दोन्ही बारमालकांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम चे कलम ३३ (डब्ल्यू), १३१ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. पुढील तपास अनुक्रमें कामशेत व वडगाव मावळ पोलिस करत आहेत. तसेच अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढेदेखील सुरच राहणार असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह केली आहे.

आयपीएस सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच…

Happy Birthday! रियल लाईफ दबंग अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक!

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत दणकेबाज कारवाई…

आयपीएस सत्यसाई कार्तीक यांची अमलीपदार्थ विकणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई…

पुणे जिल्ह्यात सत्यसाई कार्तीक यांची गुटखा विक्रेत्यावर कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka