बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एका युवकाने आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या मित्राला दारु पाजली आणि त्यानंतर खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
प्रवीण अजाबराव संबारे (वय २७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. वैभव गोपाल सोनार (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. दोघंही एकमेकांचे मित्र होते. पण मागील काही दिवसांपासून प्रवीण हा आरोपी वैभवच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता. ही बाब वैभवला खटकली. त्याने प्रवीणला फोन करून बहिणीपासून दूर राहण्याची धमकी दिली. तरीही प्रवीणने आरोपीच्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध सुरूच ठेवले. याच रागातून आरोपीने प्रवीणच्या हत्येचा कट रचला.
आरोपी वैभव आणि प्रवीण दोघंही बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळील मोकळ्या मैदानात बसले होते. आरोपी वैभवने प्रवीणला दारु पाजली. प्रवीणला नशा चढल्याचे लक्षात आल्यानंतर वैभवने प्रवीणच्या नाक आणि तोंडावर रुमाल ठेवून हत्या केली. यानंतर आरोपीने स्वत: प्रवीणचा भाऊ सचिन यास फोन करून तुमचा भाऊ दारु पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली. यानंतर सचिन घटनास्थळी दाखल झाला. त्याने प्रवीणला उपचारासाठी मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केले.
भावावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सचिन याने हत्येच्या आदल्या दिवशी आलेले कॉल रेकॉर्डिंग वारंवार ऐकले. प्रवीण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती ज्या मित्राने दिली होती, त्यानेच प्रवीणची हत्या केली असावी, असा संशय प्रवीणच्या घरच्यांना बळावला. त्यामुळे सचिनसह त्याच्या कुटुंबीयांनी मलकापूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी वैभवला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बहिणीवर प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या कारणातून ही हत्या केल्याचे वैभवने सांगितले. आरोपी वैभवने आपला गुन्हा लपवण्यासाठी तो प्रवीणच्या अंत्यसंस्काराला देखील उपस्थित होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….
भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष…
धक्कादायक! प्रेम एकावर; सात फेरे दुसऱ्यासोबत अन् लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी…
पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या…
प्रेम विवाहानंतर नवरा मैत्रिणीसोबत पळाला अन् पत्नी दिरासोबत; जाऊबाई…
The post बहिणीवर प्रेम! मित्राचा खून केला आणि अंत्यसंस्काराला उपस्थितही राहिला अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

