बारामतीः बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली आहे. या घटनेमुळे टीसी कॉलेज परिसर आणि बारामधीमध्ये खळबळ उडाली आहे.
बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे आज ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या अथर्व पोळ याचा ओंकार भोईटे आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने आणि चाकूने सपासप वार करुन हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
टीसी कॉलेज येथे हे विद्यार्थी होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होते. अथर्व पोळ हा बारावीमध्ये शिकत होता. आठ-दहा दिवसापूर्वी अथर्व पोळ आणि ओंकार भोईटे आणि त्याचा साथीदार यांच्या बरोबर वाद झाला होता. अथर्व हा आज (सोमवार) कॉलेज मध्ये आला असताना याला एकटा गाठून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याच्या पोटात चाकू खूपसून त्याचा खून केला. या संदर्भात पोलिसांनी आरोपी ओंकार भोईटेला ताब्यात घेतले असून, अधिक तपास ते करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड…
बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक…
बारामतीमध्ये कोयता हल्ल्यात कॉलेज युवकाची हत्या…
पुणे जिल्ह्यात कारचा टायर फुटल्याने काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू…
The post बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

