बारामती : बारामतीत एका मोटारीला झालेल्या अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाचा प्रकृती गंभीर आहे. बारामतीत भिगवण रोडवर हा अपघात मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
चौघे शिकाऊ विमान पायलट हे टाटा हॅरीअर गाडीने बारामतीकडून भिगवणकडे जात होते. प्रवासादरम्यान कारला अपघात झाला आणि मोटार रस्त्याच्या कडेला उलटली. मोटारीमध्ये तिघे तरुण तर एक तरुणी होती. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघात एवढा भीषण झाला की दोन पायलट जागीच ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर आहे. या शिकाऊ पायलट मध्ये एक बिहार, एक दिल्ली, राजस्थानची एक मुलगी व महाराष्ट्राचा एक मुलगा असे सर्वजण प्रवास करीत होते.
अपघात नेमका कशाने झाला याची माहिती अद्याप मिळाली नाही. जखमींना भिगवण येथील खाजगी दवाखान्यात तातडीने उपचारासाठी आणण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…
लग्न करुन परतताना भीषण अपघात; नवरा-नवरीसह 7 जणांचा मृत्यू…
नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…
The post बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

