Dailyhunt
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू.

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू.

मरावती: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेसाठी बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसाचा अपघातात मृत्यू झाला आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ठाकूर फाट्यासमोरील उर्ध्व वर्धा कालव्याजवळ हा अपघात झाला आहे.

संदीप देविदास चौधरी (वय ३९) असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. संदीप चौधरी हे २००८ पासून पोलिस दलात कार्यरत होते. सध्या ते चांदुर बाजार पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत होते.

भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा अमरावती येथील गुरूकुंज मोझरी येथे होती. या सभेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच बंदोबस्तसाठी संदीप चौधरी तैनात होते. दुपारी योगी आदित्यनाथ यांची सभा संपल्यानंतर ते घरी परतत होते. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव ठाकुर फाट्यासमोर उर्ध्व वर्धा येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

अमरावतीहुन गडचिरोली जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीसह संदीप चौधरी यांना एसटी बसने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामधे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संदीप चौधरी यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसकाकाची जिममधून आल्यावर प्रकृती बिघडली अन् घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू…

ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….

नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…

पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का…

The post अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka