Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल.

भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल.

चंदीगड (हरियाणा): भाजपच्या एका बड्या नेत्यासह काही पदाधिकाऱ्यांनी एका अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहन लाल बडौली असे गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या नेत्याचे नाव आहे.

ते हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे.

बडौली यांच्यासह एक गायक आणि भाजपचा माजी नेता रॉकी मित्तल यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमाचलच्या कसौली पोलिस स्टेशनमध्ये 13 डिसेंबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आरोपींनी पीडित अभिनेत्रीला आधी दारू पाजली आणि त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाय, भाजपच्या या नेत्यांनी पीडित अभिनेत्रीचे बलात्कार केल्यानंतर नग्न फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा आरोप देखील तक्रारदार महिलेकडून करण्यात आला आहे. अशाप्रकारे हरियाणातील एका बड्या नेत्यावर अत्याचाराचे आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.

मोहन लाल बडौली आणि रॉकी मित्तल या दोघांनी 7 जुलै 2023 ला पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. रॉकी मित्तल याने आपल्याला अभिनेत्री बनवतो असे सांगितले तर बडौलीने सरकारी नोकरी लावतो, असे सांगून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला आहे. दरम्यान, मोहन लाल बडौली यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…

पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री अडचणीत; ईडीकडून सात तास चौकशी…

अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…

बॉलीवूड अभिनेत्री पहिल्याच प्रयत्नात बनली IPS अधिकारी…

The post भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka