मुंबई : विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासट (वय ४६) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.
आत्मजा कासट या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. गुरुवारी (ता. १) संध्याकाळच्या सुमारास आत्मजा या विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारने त्यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होते. कारचालकाने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्नाळा सागरी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील याला अटक केली आहे.
उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका आत्मजा कासट यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यावर विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. यावेळी पाठी मागून एक भरधाव फॉर्च्युनर गाडी आली आणि आत्मजा यांना धडक दिली. आलिशान फॉर्च्युनर गाडीने धडक दिल्यानंतर आत्मजा दुभाजकावर जाऊन पडल्या. या अपघातात आत्मजा कासट गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर आत्मजा कासट यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! पिंपरीत अंगावर गेट पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…
यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…
हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…
हिट ऍण्ड रन! ओळख लपवण्यासाठी गाडीतच कापले केस आणि केली दाढी…
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post भरधाव फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडलं; उपचारादरम्यान मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

