Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्.

बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्.

बीड : प्रेयसीच्या आई-वडिलांकडून लग्नास नकार मिळाल्याने नेकनूर (जि. बीड) येथे अनिकेत थोरात या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एका मंगल कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अनिकेत याचे एका मुलीबरोबर प्रेम संबंध होते. दोघांना लग्न करायचे होते. यादरम्यान मुलीचे आई-वडील अनिकेतच्या घरी गेले असता मुलगी द्यायची की नाही यावरून वाद झाला. याच वादातून अनिकेत घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर, कुटुंबीयांनी व मित्रपरिवाराने परिसरात शोधाशोध केली असता एका मंगल कार्यालयात अनिकेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, अनिकेतच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून, त्यात पाच नावे आहेत. आता, या प्रकरणात नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहे.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका नामांकित हॉटेलमध्ये दोन जोडपे गेल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हे जोडपे ओळखीचे असल्याने काही जमाव एकत्र जमा झाला आणि जमावाकडून जोडप्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमाव हिंसक होत असल्याचे पाहून पोलिसांनी चक्क लाठीचार्ज केला.

मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…

Video : मुलाच्या हातातून मोबाईल घेतला अन् त्याने आईच्या डोक्यात घातली बॅट…

धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…

नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka