Dailyhunt
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या.

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या.

बीड: बीड शहरातील पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी उघडकीस आली आहे.

अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआंबा ता.केज जि बीड) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी सध्या सीआयडी आणि विशेष तपास पथकाचे (एसआयटी) अधिकारी सध्या बीड शहरात तळ ठोकून आहेत. बीड शहर पोलिस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे केंद्रस्थान आहे. याच पोलिस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केल्याने चर्चांना उधाण आले आहे. अनंत इंगळे यांच्यावर नेमका कोणता दबाव होता की त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

इंगळे यांनी अशाप्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट का केला? त्यांच्या आत्महत्येमागं नेमकं कारण काय? याची माहिती अद्याप समोर आली नाही. इंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या केल्यानं बीडच्या पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून, आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडला मिळाले नवीन पोलिस अधीक्षक!

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

बीड मध्ये पोलिस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड…

The post बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka