Dailyhunt
सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडला मिळाले नवीन पोलिस अधीक्षक!

सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडला मिळाले नवीन पोलिस अधीक्षक!

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा केली होती.

बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर अवघ्या २४ तासांत बीडला नवीन पोलिस अधीक्षक मिळाले आहेत.

नवनीत कांवत यांची बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांसह स्थानिक लोकांकडून केली जात आहे. स्थानिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासात कुचराई केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर बारगळ यांची शुक्रवारी बदली करण्यात आली.

बारगळ यांची बदली केल्यानंतर अवघ्या २४ तासांत बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनीत कांवत यांनी यापूर्वी संभाजीनगरचे पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहिले. संभाजीनगरपासून बीड हे अगदी जवळचं ठिकाण आहे. तसेच मागच्या काही काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर देखील कांवत यांचे लक्ष होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने व्हावा, यासाठी कांवत यांच्याकडे हा पदभार दिल्याचे समजते. बीडमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचे मोठे आव्हान कांवत यांच्यासमोर असणार आहे.

कोण आहेत बीडचे नवे SP नवनीत कांवत?
नवनीत कांवत हे 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानचे असून त्यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. कांवत यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झाले. सहावी ते 12 वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगढ इथे झाले. ते शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते. वडिलांनी त्यांना एक आव्हान दिले आणि नवनीत यांनी दहावी, 11 वी आणि 12 वी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. स्वत:वर विश्वास ठेवून त्यांनी दहावीत अव्वल क्रमांक पटकावला. 12 वीनंतर नवनीत यांनी आयआयटीमध्ये प्रवेश केला, तिथे त्यांनी बी टेक केले. त्यांची आई शिक्षिका, वडील रेल्वेत होते, त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले जात होते, पण नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता. नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिजाईन इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली. यादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले. तिथे त्यांनी अभ्यास करुन ते 2017 मध्ये IPS अधिकारी बनले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पुन्हा महासंचालकपदी वर्णी…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…

The post सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडला मिळाले नवीन पोलिस अधीक्षक! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka