Dailyhunt
धक्कादायक! अहमदनगर जिल्ह्यात दिराने केली दोन वहिनींची हत्या.

धक्कादायक! अहमदनगर जिल्ह्यात दिराने केली दोन वहिनींची हत्या.

हमदनगर : एका दिराने आपल्या दोन वहिणींची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी हातात कोयता घेऊन गावात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर गावात ही घटना घडली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून दिरानेच आपल्या दोन भावजयांची कोयत्याने वार करून हत्या केली आहे. आरोपी दीर गावातून हातात कोयता घेऊन फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात सोमवारी (ता. ७) भर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे याने किरकोळ पैशाच्या वादातून उज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे यांची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना दोन्ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. आरोपी घटनस्थळावरून फरार झाला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दत्तात्रय प्रकाश फापाळे (वय 50) याने लहान भावजयी उज्ज्वला अशोक फापाळे (वय 38), चुलत भावजयी वैशाली संदीप फापाळे (वय 40) यांचा सोमवारी दुपारी अडीच वाजता धारदार कोयत्याने हत्या केली. आरोपी दत्तात्रय फापाळे ऊर्फ बापू हा अविवाहित आहे. लहान भाऊ अशोक याचे लग्न झाले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्याची पत्नी मृत उज्ज्वला आणि दोन मुले आळंदी येथे मोलमजुरीचे काम करत उदरनिर्वाह करतात. फाफळे कुटुंबाची बदगी गावात शेती आहे. त्या शेतीमध्ये दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाआड शेती पीक घ्यायचे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आली होती. उज्जवला गावाला आल्यापासून दीर दत्तात्रय याचे पैशावरून वाद व्हायचे. याच रागातून दत्तात्रय याने हत्या केली.

वैशाली व उज्ज्वला एकाच भावकीतल्या होत्या. उज्ज्वला दोन दिवसांपूर्वी गावी आली होती. वैशाली घटनास्थळाशेजारील दवाखान्यात उपचार घेऊन उज्ज्वलाशी गप्पा मारत होती. उज्ज्वलावर पहिला वार होताच ती सोडवायला गेली आणि तिच्यावरही सपासप तीन वार झाले आणि त्यातच तिचा जीव गेला, दोघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले. खुनाची घटना झाली त्यावेळी या महिला किंचाळत होत्या. त्यानंतर तो भर गावातून जंगलाच्या वाटेने निघून गेला. घटनेनंतर गावादेखत आरोपी पायी गेला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने आरोपीसोबत बसून ओढले सिगारेटचे झुरके…

नाशिकमध्ये पोलिसकाकावर भर रस्त्यात चाकू हल्ला; आरोपीला पकडलेच…

माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह…

बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

The post धक्कादायक! अहमदनगर जिल्ह्यात दिराने केली दोन वहिनींची हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka