पुणे : एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेवर कोयत्याने वार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गौरी लणेश आरे (वय 25, राहणार विश्रांतवाडी) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
आरोपी अमोल कांबळे आणि गौरी हे दोघे एकाच शाळेत शिकत होते. शाळेत असल्यापासून अमोल याचे गौरीवर एकतर्फी प्रेम होते. माझ्याशी लग्न कर म्हणून त्याने गौरीकडे तगादा लावला होता. मात्र, गौरीला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते, तसं तीने त्याला सांगितले होते. त्यानंतर गौरीचे लग्न तिच्या कुटुंबाच्या मर्जीने लणेश धनाजी आरे यांच्याशी झाले होते.
गैरी हिने लग्न केल्यामुळे आरोपी अमोल कांबळे हा चिडला होता. त्यातच गौरीने त्याच्याशी बोलंण बंद केल्यामुळे तो आणखी चिडला. त्याने इन्स्टाग्रामवर गौरी आणि तिच्या पतीचा फोटो टाकून भावपुर्ण श्रद्धांजलीची पोस्ट केली. त्यानंतर त्याने रात्री साडेआठच्या सुमारास गैरी आपल्या मैत्रिणीसोबत पायी घरी येत असताना तिच्यावर कोयत्याने वार केला. या घटनेत गौरी गंभीर जखमी झाली, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात गौरीच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…
पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न…
महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…
पुणे शहरात होस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ काढून पाठवले मित्राला…
एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…
The post धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

