अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेले एअर इंडियाच्या विमानाने (AI171) आज (गुरूवार) दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी टेक ऑफ केल्यानंतर हे विमान रहिवासी भागात कोसळले. या विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते.
242 जणांना घेऊन जाणाऱ्या या विमानातल्या सर्व जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या 12 केबिन क्रू मेंबर्सपैकी 3 कर्मचारी महाराष्ट्राचे तर तीन जण प्रवासी असे एकूण 6 जण असल्याची माहिती समोर आली आहे. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे या तीन महिला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानात होत्या. अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. अपर्णा महाडिक या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याच्या पत्नी आहेत. अहमदाबादहून लंडनचं विमान असल्यामुळे अपर्णा महाडिक या आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या. अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे तीन जणही या विमानामध्ये होते.

