Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न.

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न.

वी दिल्ली: श्रीनगर-दिल्ली विमान लँडिंग करताच यलट विमानतळावर इतर औपचारिकता पूर्ण करत असताना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका पायलटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

अरमान (वय 28) असे मृत्यू झालेल्या वैमानिकाचे नाव असून, त्याचे नुकतेच लग्न झाले होते.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर कॉकपिटमध्ये पायलटला उलट्या झाल्या आणि काही वेळाने तो बेशुद्ध पडला. त्यानंतर एअरलाइनच्या डिस्पॅच ऑफिसमध्ये हृदयविकाराच्या झटका आला. पायलटला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे सहकारी क्रू मेंबर्सनी सांगितले.

एअर इंडिया एक्स्प्रेसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘आमच्या सहकाऱ्याच्या निधनाबद्दल आम्ही आमच्या मनापासून शोक व्यक्त करतो. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत आणि सर्वतोपरी मदत करत आहोत. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि कोणत्याही अनावश्यक अटकळ व्यक्त करणे टाळाव्यात. पायलटच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल.’

Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…

चोराला 10 बायका, 6 मैत्रिणी, 5 स्टार हॉटेलमधील वास्तव्य अन् विमानाने प्रवास…

मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

विमानतळावर तपासणी करतानाच परदेशी महिलेच्या अंडरगारमेंटमध्ये…

प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka