पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात हलविण्यात आले असून, सांगलीला जात असताना गजा मारणे याने एका ढाब्यावर थांबून मटण पार्टी केली.
गजा मारणे याला मटण बिर्याणी, पैसे, कपडे, बकेट व इतर वस्तू देऊन मदत करणाऱ्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पुण्यापासून सांगलीपर्यंत पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करत गजा मारणेसाठी फिल्डिंग लावली होती. त्याने गजा मारणे याला बिर्याणी पुरवली होती.
पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com
पुणे शहर पोलिस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेत बंदोबस्तावरील सहायक पोलिस निरीक्षकासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर, गजा मारणेला घेऊन जात असताना पोलिस ताफ्याचा पाठलाग करत मारणे याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराईतासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना वाटेत ढाब्यावर मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल (बुधवारी) अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या मारणेला बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते याने पैसे, कपडे, बकेट व इतर वस्तू देऊन मदत केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष न्यायालयाने पांड्याला पाच दिवसांची 'मकोका' कोठडी सुनावली आहे.
गजा मारणेसोबतच्या मटण पार्टीनंतर गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक सुरजकुमार यलप्पा राजगुरू, हवालदार महेश लक्ष्मण बामगुडे, हवालदार सचिन लक्ष्मण मेमाणे, रमेश ताऊजी मेमाणे व शिपाई राहुल मनोहर परदेशी अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गजा मारणे याला सांगली येथील कारागृहात घेऊन जात असताना पोलिस बंदोबस्तावर सहायक पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचारी होते. मारणेला सांगली कारागृहात नेत असल्याची माहिती त्याच्या साथीदारांना मिळाली. मारणेच्या व्हॅनच्या मागावर साथीदारांच्या कारचा ताफा होता. पुणे-सातारा महामार्गावरील एका ढाब्यावर व्हॅन थांबवण्यात आली. बंदोबस्तात असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी ढाब्यावर जेवण केले. त्याठिकाणी मारणे याला मोटारीतून आलेल्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मारणे याला बिर्याणी नेऊन दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. मारणे याच्या मटण पार्टीची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी केली.
दरम्यान, कोथरूड येथील आयटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या उर्फ श्रीकांत पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यात पांड्याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासोबतच त्या ढाब्यावरील मटण पार्टीवेळी गजा मारणेची भेट घेणारे प्रदीप कंधारे, सतीश उर्फ आबा सुधाकर शिळीमकर व विशाल विलास धुमाळ यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, रुपेश मारणे व बाब्या पवार यांचा पोलिस तपास करत आहेत.
कुख्यात गुंड गजा मारणेची 'मटण पार्टी' पडली महागात; पोलिस निलंबीत…
कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर…
गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण…
पुण्यातील गुंड गजा मारणे याला रिल्स बनवणं पडलं महागात…
रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार…
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…
The post गुंड गजा मारणे मटण पार्टी प्रकरणी मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

