Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरातील वारजे माळवाडीतील गुंडाची आता खैर नाही.

पुणे शहरातील वारजे माळवाडीतील गुंडाची आता खैर नाही.

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील रामनगर, म्हाडा कॉलनी, गोकुळनगर इत्यादी ठिकाणी वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी वारजे माळवाडी पोलिसांकडून संभाजी कदम, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ ०३, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभावी काम सुरु करण्यात आले आहे.

सायंकाळी दोन ते तीन अधिकारी व पाच-सहा कर्मचा-यांची फुट पेट्रोलिंग नेमण्यात येत आहे. यामधून टवाळखोरांना चाप बसण्याबरोबरच गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.

चौकात अकारण बसून महिलांची छेडकानी होण्याची शक्यता नष्ट करण्यासाठी आशा चौकामध्येही मुद्दाम थांबून व्हिजीबल पोलिसींग केले जात आहे. बाजारपेठा व इतरत्र भेटणा-या महिलांना विचारपूस करुन कोठे त्रास होत आहे का? याबाबत माहिती घेतली जात आहे. दुस-या बाजुला गुन्हेगारी पार्श्वभुमी असणा-या व सार्वजनिक शांततेस गालबोट लागू शकेल असे गुन्हे करण्याची शक्यता असणा-या गुन्हेगारांना गजाआड पाठवण्याचेही धोरण अवलंबण्यात येत आहे.

वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी १) अभिजीत ऊर्फ चोक्या तुकाराम येळवंडे, २) ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते, ३) गौरव संजय शेळके व ४) ओंकार ऊर्फ ढेण्या सुधाकर चौधरी इत्यादी आरोपींना सन २०२५ मध्ये आज पावेतो महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषय गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती कारवाया प्रतिबंधक कायदा ( एम. पी. डी.ए.) अंतर्गत एक वर्ष स्थानबद्ध करण्यासाठी वारजे पोलिसांनी प्रस्ताव पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ – ०३, पुणे शहर यांच्या मार्फतीने पोलिस आयुक्त कार्यालयात पाठवले होते.

जिल्हा दंडाधिकारी तथा पोलिस आयुक्त यांनी सदर प्रस्तावांची गुणवत्ता पडताळून त्या आरोपींना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगार लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडबा शेंडगे, रोहित वसंत पासलकर, आदित्य ऊर्फ बंडी गणेश मंडलीक यांचेविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे. सदर आरोपींना जामीन होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. ओंकार ऊर्फ ढेण्या सुधाकर चौधरी याने अल्पवयीन असताना त्याच्या नावावर ०४ गुन्ह्यांची नोंद आहे. परंतु १८ वर्षे पुर्ण केल्यावरही मागील दिड दोन महिन्यांमध्ये दोन गुन्हे केल्याने व त्याची रामनगर परिसरात सुरळीत चालेल्या दैनंदिन जिवनास बाधा निर्माण झाल्याने त्याला स्थानबद्ध करण्याविषयी अभ्यासपुर्ण प्रस्ताव या पोलिस ठाणेचे प्रभारी विश्वजीत काईंगडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व निलेश बडाख, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप-निरीक्षक मनोज साळुंखे, पोलिस अंमलदार किरण तळेकर व विजय खिलारी यांनी तयार केला होता व तो मान्य करुन त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश झाला. त्यावरुन त्यास २२/०२/२०२५ रोजी जिल्हा कारागृह बुलढाणा येथे ठेवण्यात आलेले आहे.

यापुर्वीही स्थानबद्ध करणा-यांना तपास पथकाचे संजय नरळे, पोलिस उप-निरीक्षक, पोलिस अंमलदार बालाजी काटे,सागर कुंभार, योगेश वाघ, निखील तांगडे, शरद पोळ, गोविंद कपाटे व अमित शेलार यांनी मेहनत घेवुन लोणावळा, धायरी, रामनगर अशा परिसरातून ताब्यात घेवून नागपुर, नाशिक, बुलढाणा अशा कारागृहामध्ये बंदिस्त केलेले आहे. यापुढेही ही मोहिम अधिक तिव्र करण्यात येणार असुन कोणताही गुन्हेगार कायदा हातात घेईल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी वारजे पोलिसांनी ठेवलेली आहे. काही गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे व निडरपणे आपले व्यवहार करावेत कोणीही गुन्हेगार त्यांना त्रास देत असल्यास तातडीने वारजे पोलिसांसी संपर्क करावा, असे आवाहन वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी केले आहे.

गुन्हेगारावर यापुढे झीरो टॉलरन्सचे धोरण अवलंबत त्यांना कठोरात कठोर शासन कसे होईल व ते गुन्हेगारीतून परावृत्त कसे होतील हे पाहण्याकडे कटाक्ष राहणार आहे. या संपुर्ण कारवाईत प्रविणकुमार पाटील, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, संभाजी कदम, परिमंडळ ०३, पुणे शहर, भाऊसाहेब पठारे, सहाय्यक पोलिस आयुक्त कोथरुड विभाग, पुणे शहर यांचे मोलाचे सहकार्य मिळालेले आहे.

कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर…

पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं…

पुणे पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडूळ केले जप्त…

पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती…

पुणे पोलिस दलातील १८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

The post पुणे शहरातील वारजे माळवाडीतील गुंडाची आता खैर नाही… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka