Dailyhunt
हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर.

हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर.

खनौ (उत्तर प्रदेश): हनिमूनदरम्यान नवं दाम्पत्याचा मृत्यू झाला असून, प्रदीप आणि शिवानी असे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हनिमूनच्या रात्री प्रदीप आणि शिवानी त्यांच्या खोलीत गेले होते.

पण, दुसऱ्या दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. वधू शिवानीचा मृतदेह बेडवर तर प्रदीप खोलीतील पंख्यावर लटकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रदीपने आधी पत्नी शिवानी हिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत:ला गळफास लावून घेतला. सकाळी कुटुंबीयांनी दरावाज तोडून खोलीत प्रवेश केल्यानंतर दोघंही मृतावस्थेत पडले होते. दरवाजा आतून बंद होता, अशा परिस्थितीमध्ये तिसरा कोणी खोलीत असण्याची शक्यता फार कमी आहे. दोघांचेही मोबाईल कॉल डिटेल्स, व्हॉट्सअॅप चॅटिंगची तपासणी केली जात आहे, असं पोलिसांनी सांगितले.

प्रदीप याच्या मोबाईलवर कोणीतरी मेसेज पाठवला होता, असेही समोर आले आहे. प्रदीपला हा मेसेज नेमका कोणी पाठवला आणि मेसेजमध्ये काय म्हटले होतं, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रदीपने शिवानीला सांगितले की, तुझे आधीच प्रेमसंबंध होते, हनिमूनच्या रात्री प्रदीप आणि शिवानीमध्ये याच गोष्टीवरुन वाद झाल्याची माहिती पुढे येत आहे. पण, हे सर्व अंदाज वर्तवले जात आहे, अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी दिली नाही.

दरम्यान, प्रदीप आणि शिवानी हिचे 7 मार्च रोजी लग्न झाले होते. दोघांच्या संमतीनेच हे लग्न ठरलं होते. पण असं नेमकं काय झालं हे समजत नाही असं नातेवाईकांनी म्हटले आहे. मुलाच्या मोठ्या भावाने सांगितले की, रविवारी रिसेप्शन होतं. ज्याची जोरदार तयारी सुरू होती. मी कुटुंबातील काही इतर सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत भाज्या खरेदी करण्यासाठी गेलो होतो. मी भाज्या खरेदी करत असताना मला घरून फोन आला. कुटुंबातील सदस्यांनी लवकर घरी येण्यास सांगितले. मी घरी पोहोचलो तेव्हा कुटुंबातील सर्वजण रडत होते.

हनिमूनच्या रात्री पत्नीने गरोदर असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…

धक्कादायक! हनिमूनच्या रात्री सासरच्यांनी महिलेची तपासली व्हर्जिनिटी अन्…

हनिमूनच्या रात्री नवऱ्याबाबत समजली खरी माहिती अन् तिने थेट…

हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…

हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…

हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…

The post हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka