Dailyhunt
हृदयद्रावक! आईच्या डोळ्यात देखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू.

हृदयद्रावक! आईच्या डोळ्यात देखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू.

सोलापूर : अक्कलकोट येथील म्हैसलगी जवळच असलेल्या भिमा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये बुडालेल्या लहान मुलीची दुसरी मोठी मुलगी मावशी होती.

आरती निकंबे असे मावशीचे नाव असून रुपाली माने असे मुलीचे नाव आहे.

रुपालीची आई शोभा माने यांच्यासोबत दोघीही नदीवर धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी आरती निकंबे हिचे वडील आणि रुपालीचे मामा किरण भिमराव निकंबे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

शोभा कुमार माने या त्यांची लहान बहीण आरती निकंबे (वय १४) आणि मुलगी रुपाली माने (वय ८) यांना घेऊन धुणं धुवायला गेल्या होत्या. घरापासून काही अंतरावरच असलेल्या भिमा नदीच्या पात्रात त्या धुणं धुवत होत्या. त्यावेळी शोभा यांची मुलगी रुपाली ही खेळता खेळता पाण्यात बुडायला लागली. तेव्हा तिला वाचवण्यासाठी रुपालीची मावशी आरती हिने पाण्यात उडी मारली. त्या दोघींना वाचवण्याचा प्रयत्न शोभा यांनी केला पण त्यात यश आले नाही.

शोभा माने यांनी या घटनेनंतर आरडाओरडा केल्यानं जवळचे नागरिक पळत घटनास्थळी आले. दोघींनाही त्यांनी नदीपात्रातून बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. शोभा माने यांच्या डोळ्या देखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू झाल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे.

रुपाली ही लहानपणापासूनच म्हैसलगी येथे मामाकडे राहते. रुपालीची आई शोभा माने या गावच्या यात्रेसाठी १५ दिवसांपूर्वी हंजगी इथुन म्हैसली येथे राहण्यासाठी आल्या होत्या. घरापासून ४०० मीटर अंतरावर असणाऱ्या नदीत धुणं धुवायला गेल्या असताना मुलगी आणि बहिणीचा बुडून मृत्यू झाला. महिन्याभरापूर्वीच नदीत पाणी सोडण्यात आल्यानं पाणी पातळी वाढली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव…

हृदयद्रावक! एक चिमुकली पाण्यात पडली अन् पुढे तिघींचा मृत्यू…

हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या…

हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश…

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…

हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…

The post हृदयद्रावक! आईच्या डोळ्यात देखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka