Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले.

हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले.

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका पाझर तलावात आई आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंप्री गवळी गावाजवळ असलेल्या तलावात सोमवारी हे तीन मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

गावकऱ्यांना तलावातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी तलावापाशी जाऊन पाहिले असता पाण्यावर एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. तिन्ही मृतदेह बऱ्यापैकी कुजले आहेत. आईने आपल्या दोन चिमुकल्यांना स्वःतच्या शरीराला बांधलेल्या अवस्थेत पाझर तलावात हे मृतदेह सापडले होते. या मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. पार्वती प्रकाश इंगळे (वय 30), आर्यन प्रकाश इंगळे (वय 8) आणि प्राची प्रकाश इंगळे (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. या महिलेच्या कंबरेला दोन्ही मुले बांधलेले असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. मात्र, तिने आत्महत्या का केली? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

दरम्यान, याच तलावात गेल्या आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. यामुळे पिंपरी गवळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या…

नाशिक हादरलं! एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह…

Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…

नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…

पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka