नाशिक : लग्नासाठी मुलगी बघायला गेलेला युवक चार दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर पाचव्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पूर आलेल्या नदीपात्रात पूल पार करण्याच्या प्रयत्नात तो वाहून गेला होता.
लग्नासाठी मुलगी बघायला गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील भेनशेत येथील खोबळा दिगर येथे घडली आहे. वसंत सुरेश मासी (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. खोबळा दिगर (ता. सुरगाणा) येथील वसंत हा पार नदीच्या पलीकडे जवळच असलेल्या केळधा (रा. गुजरात) येथे मुलगी बघण्यासाठी बुधवारी निघाला होता. आपली दुचाकी भाटी येथे नदीच्या तीरावर उभी करून तो पायी नदी पार करण्यासाठी उतरला होता.
संबंधित भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे पार नदीला पूर आलेला होता. याच पुराच्या पाण्यातून वसंत निघाला असता नदीच्या पात्रात पडल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. चार दिवस उलटूनही वसंत घरी न आल्याने वडिलांनी सर्वत्र चौकशी केली. याचवेळी भाटी येथे एक दुचाकी बेवारस असल्याची माहिती कुटुंबाला व मित्रांना समजली. त्याची चौकशी केली असता ती वसंतची दुचाकी असल्याचे समजले. यावरुन अनुचित प्रकार घडला असल्याचे लक्षात आले. याच दरम्यान पाच किलोमीटर अंतरावर नदीच्या काठावर एक मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याचे समजले. कुटुंबीयांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो वसंत असल्याचे कळाले. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
नाशिक हादरलं! एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह…
नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…
नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…
The post हृदयद्रावक! लग्नासाठी मुलगी बघायला निघाला अन् मृत्यू झाला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

