पुणे : पुणे शहरातील वानवडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर ससानेनगर भागात टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते.
निहाल सिंग टाक याने पोलिस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला करत जखमी केले होते. निहाल सिंग आणि राहुल सिंग हे दोघे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले होते. यापूर्वी या आरोपींकडे पिस्तूल आढळलं होतं. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोहीम राबवली होती. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुण्यात पोलिसांवर कोयत्याने हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींना अखेर अटक केली. सोलापूरच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांची केलेली अवस्था पाहून गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल.
दरम्यान, वानवडी पोलिस स्टेशनचे एपीआय रत्नदीप गायकवाड ससानेनगर भागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना दोन मोटार सायकल चालकांमध्ये वाद सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी रत्नदीप गायकवाड यांच्यावर निहाल सिंग टाक याने कोयत्याने हल्ला केला होता. निहाल सिंग टाक या घटनेनंतर इतरांसह फरार झाला होता.
पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशनचे एपीआय रत्नदीप गायकवाड जखमी झाले होते. या हल्ला प्रकरणानंतर रत्नदीप गायकवाड यांचा जखमी झालेला फोटो व्हायरल झाला आहे. रत्नदीप गायकवाड हे रुग्णालयात दाखल असून, त्यांनी साहेब मला लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचं आहे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.
पुणे शहरात टोळीला पकडायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला…
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…
Video: 'खैके पान बनारस वाला' या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
The post Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

