Dailyhunt
हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू.

हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू.

त्रपती संभाजीनगर : कुटुंबातील किरकोळ वादानंतर एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतल्यानंतर तिला वाचवण्यासाठी पती आणि दोन लहान मुलींनी धाव घेतली. यात दोन्ही चिमुकल्या मुली गंभीररित्या भाजल्या होत्या.

सात महिन्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सहा वर्षीय मुलीचा उपचारावेळी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अप्पासाहेब आसाराम कोकाटे आणि त्यांची पत्नी कोमल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. अप्पासाहेब हे अवैधरित्या पेट्रोल-डिझेल विक्रीचा व्यवसाय करतात. यावरूनच सतत पती पत्नीमध्ये खटके उडायचे. रविवारी (ता. २४) रात्री ८ वाजता रागाच्या भरात कोमलने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. पत्नीने पेटवून घेताच तिला वाचवण्यासाठी अप्पासाहेब यांनी धाव घेतली. मात्र या आगीत अप्पासाहेब ५० टक्के भाजले. आई आगीत होरपळत असताना दोन्ही चिमुकल्या मुली तिला मिठी मारण्यासाठी धावल्या आणि दोघीही गंभीर भाजल्या होत्या. याची माहिती शेजाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही रुग्णालयात नेले. मात्र सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याने आगीचा मोठा भडका उडाला. यामुळे घरातील इतर साहित्यालाही आग लागली. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! चिमुकलीला गळफास देऊन बापानी केली आत्महत्या…

हृदयद्रावक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची हत्या करून बापाची आत्महत्या…

हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्…

हृदयद्रावक! तलावाजवळ मुलांची कपडे दिसली अन् फुटला हंबरडा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka