अकोला: अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथून देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून अकोल्यातील दोनद येथील देवीच्या दर्शनाला जात असताना दुचाकीत पदर अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे.
पल्लवी नवलकर (वय २५, रा. दहिगाव गावंडे) असे मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दुचाकीने दहिगाव गावंडे येथून दोनद येथील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकून त्या रस्त्यावर पडल्या. दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पल्लवी यांचा वाटेतच मृत्यू झाला.
पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे. पल्लवी नवलकर यांचा अशाप्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील आठवड्यात असाच अपघात झाला होता. सिल्लोड फुलंब्री रस्त्यावरून जात असताना एका महिलेचा दुचाकीच्या चाकात पदर अडकून मृत्यू झाला होता. मुलाच्या डोळ्यादेखत आईचा जागीच मृत्यू झाला होता.
हृदयद्रावक! आई रक्ताच्या थारोळ्यात अन् चिमुकला मृतदेहाला बिलगलेला…
शिरीष महाराज मोरे यांच्या चार हृदयद्रावक सुसाईड नोट आल्या समोर…
हृदयद्रावक! शेकोटीत पडलेल्या 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू…
हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू…
हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…
The post हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

