बीडः पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना पत्नीला कळताच धक्का सहन झाला नाही. पतीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीनेही जीवन संपविले. यानंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना खामकरवाडी गावात (जि.
खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय 48) यांचे बायपासचे ऑपरेशन झालेले होते. गुरुवारी पहाटे त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांना शिरूर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती गावाकडे समजल्यानंतर खामकर परिवारासह, नातेवाईक, गावावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या मृत्यूची बातमी पत्नी राहीताई कन्हैयालाल खामकर (वय 42) यांना समजताच त्यांना मोठा धक्का बसला. हा धक्का राहीताई यांना सहन झाला नाही. राहीताई खामकर यांनी कोणालाही न समजू देता विषारी द्रव प्राशन केला. सकाळी सहा वाजता त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेले. यावेळी राहीताई खामकर यांनी उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या लोकांना मला देखील माझ्या पतीच्या चितेवरच अग्निडाग द्या म्हणून सांगत होत्या.
शिरूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर बीडला पुढील उपचारासाठी नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. खामकरवाडी येथील स्मशानभूमीत एकाच चितेवर कन्नालाल खामकर आणि पत्नी राहीताई खामकर दोघांना अग्निडाग दिला. अंत्यविधीसाठी उपस्थित नागरिकांच्या अश्रूचा बांध फुटला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू…
हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे…
हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…
हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या…
हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…
हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…
The post हृदयद्रावक! पती-पत्नीचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

