Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप.

हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप.

मुंबई : विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (PSI) रतिकांत भद्रेशेट्टे (वय 35) यांनी मंगळवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास बोळीज येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

घरच्या छताच्या हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतिकांत भद्रेशेट्टे यांच्या मागे पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले रतिकांत भद्रेशेट्टे हे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नैराश्यात होते. त्यांच्या कुटुंबात एकामागून एक दुःखाचे डोंगर कोसळत होते. कोरोना काळात आई-वडिलांचे छत्र हरवले. काही महिन्यांपूर्वीच दोन्ही भावांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे, सातत्याने येणाऱ्या दु:खाच्या घटनांनी ते नैराश्यात होते. त्यांनी सुद्धा टोकाचं पाऊल उचलत जगाचा निरोप घेतला आहे. बोळींज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येच्या कारणांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या…

पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…

पोलिसकाकाची जिममधून आल्यावर प्रकृती बिघडली अन् घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन…

The post हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka