Dailyhunt
पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन.

पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन.

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुका पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. ऑन ड्युटी असताना पोलिस कर्मचाऱ्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सागर गायकवाड असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सागर गायकवाड हे पोलिस हवालदार या हुद्द्यावर महाड तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आपली ड्युटी बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गायकवाड हे वॉरंट बनवण्याचे काम करीत होते. अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखायला सुरुवात झाली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपस्थित सहकाऱ्यांनी तातडीने सागर गायकवाड यांना महाड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, हृदयविकाराचा झटका मोठा आल्याने गायकवाड यांचे निधन झाले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, सागर गायकवाड यांनी यापूर्वी महाड शहर पोलिस ठाणे, म्हसळा पोलिस ठाणे, पोलादपूर पोलिस ठाणे, रायगड जिल्हा अधीक्षक कार्यालय, वाहतूक पोलिस महाड अशा अनेक ठिकाणी पोलिस खात्यामध्ये काम केले होते. गायकवाड यांच्या अचानक जाण्याने पोलिस प्रशासन विभागावर शोककळा पसरली आहे. गायकवाड यांच्या मागे पत्नी महिला पोलिस हवालदार नीलिमा गायकवाड आणि एक मुलगी, मुलगा असा परिवार आहे. सागर गायकवाड हे मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर गायकवाड यांच्या निधनामुळे कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Video: पोलिसकाकाने 'ऑन द स्पॉट' लावला चोरट्यांचा निकाल…

पोलिसकाकाला चालकाने फरफटत नेलं अन् चिरडलं; जागीच मृत्यू…

ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….

नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…

पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का…

The post पोलिसकाकाचे ऑन ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka