Dailyhunt
कोल्हापूर! बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची निर्घृण हत्या.

कोल्हापूर! बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची निर्घृण हत्या.

कोल्हापूर : एक वर्षांपूर्वी चूलत बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कौलगे (ता. कागल) येथे घडली आहे. स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील (वय 30) असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

अत्यंत क्रूर पद्धतीने हा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी आशुतोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील (वय 25 रा. कौलगे) व सागर संभाजी चव्हाण (रा. नानीबाई चिखली) यांना अटक केली आहे. स्वप्निल हा एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. स्वप्निलच्या वडिलांनी 15 जानेवारीला स्वप्निल घरी आला नसल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर स्वप्निलचा मृतदेह खडकेवाडामध्ये पडला असल्याची माहिती मिळाली. मुलाचा खून झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींचा माग काढला. मृत स्वप्नील पाटील आणि आरोपी आशुतोष पाटील याचे गावामध्ये घर शेजारीच आहेत. स्वप्नीलने वर्षभरापूर्वी त्याच्या चुलत बहिणीची छेड काढली होती. त्यावेळी गावपातळीवर हे प्रकरण मिटवण्यात आले होते. मात्र, बहिणीची छेड काढल्याचा राग आशुतोषच्या डोक्यामध्ये होता. त्यामुळे 15 जानेवारीच्या रात्री स्वप्निल, आशुतोष आणि सागर चव्हाण एकत्र फिरत होते, अशी माहिती मिळाल्यानंतर खुनाचा उलघडा झाला.

स्वप्निलचा खून केल्यानंतरत त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याच्या चेहऱ्याचा दगडाने चेंदामेंदा केला होता. तसेच गाडीमधील पेट्रोल काढून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

बीड! प्रेयसीच्या दारात जाऊन खिडकीतून केला गोळीबार…

बहिणीवर प्रेम! मित्राचा खून केला आणि अंत्यसंस्काराला उपस्थितही राहिला अन्…

कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच चाकूने भोसकलं…

कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…

कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार…

The post कोल्हापूर! बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची निर्घृण हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka