Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, चांदी गायब अन्.

कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, चांदी गायब अन्.

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात चांदीचा व्यापार करणाऱ्या एका व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे असे हत्या झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे यांची चोरीच्या उद्देशानेच हत्या झाल्याची शक्यता आहे. ब्रह्मनाथ हालोंढे यांच्या हत्येनंतर त्यांच्याकडील 25 किलो चांदी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. सध्या हुपरी आणि गोकुळ शिरगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या आराम कॉर्नर परिसरात हातगाडी लावण्यावरुन झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. इम्रान मुजावर आणि युसूफ अलमजीद या दोघांमध्ये हातगाडी लावण्यावरुन वाद झाला. त्यावेळी युसूफने इम्रान याची पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली. यानंतर दुसरी घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच चाकूने भोसकलं…

कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…

कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…

कोल्हापूरमध्ये कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह तिघींचा मृत्यू…

कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार…

The post कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, चांदी गायब अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka