Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लष्करातील जवानाच्या चार लग्नांची पत्नीने केली पोलखोल.

लष्करातील जवानाच्या चार लग्नांची पत्नीने केली पोलखोल.

खनौ (उत्तर प्रदेश) : एका महिलेने सैनिक पतीवर 10 वर्षांत चार विवाह केल्याचा आरोप केला आहे. आपल्याला तीन वर्षांचा मुलगा असून पतीला जाब विचारला असता मुलासह तो आपल्याला सोडून निघून गेला, असे पीडित महिलेने म्हटले आहे.

शिवाय, पोलीस ठाण्यामध्ये तिची तक्रार चुकीच्या पद्धतीने लिहून घेतल्याचा आरोपही केला आहे.

पीडित महिला हैदराबादमध्ये राहणारी आहे. तिचा नवरा मनीष हरियाणातल्या कुरुक्षेत्र येथील मानेसर अर्बन स्टेटमध्ये राहतो. तो सैनिक असून सध्या लडाखमध्ये तैनात आहे. 2015 मध्ये त्याची बदली हैदराबादमध्ये झाली होती, तेव्हा दोघांचे प्रेमसंबंध झाले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर काही दिवसा नंतर मनीषने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. शिवाय, गर्भपात करण्यास भाग पाडले. मग 2018 मध्ये न सांगताच बेपत्ता झाला. त्यानंतर महिलेनं त्याचा शोध घेतला असता तो मेरठमध्ये असल्याचे तिला समजले. शिवाय, तो आधीपासूनच विवाहित असल्याचे समजल्यानंतर धक्का बसला.

पीडित महिलेनं पोलिसात तक्रार करण्याची धमकी नवऱ्याला दिली तेव्हा त्याने तिच्यासोबत राहण्याचे कबूल केले. पहिल्या पत्नीला सोडेन असेही त्याने सांगितले. मग पीडित महिला आणि तिचा नवरा मनीष कंकरखेडा येथे राहू लागले होते. फेब्रुवारी 2021मध्ये त्यांना मुलगा झाला. त्यानंतर नवरा पुन्हा बेपत्ता झाला. ऑगस्ट 2021मध्ये त्याचा शोध लागला तेव्हा तो तक्षशिला कॉलनीमध्ये राहत असल्याचे कळले. पण, तिथेही तो दोन महिलांसोबत राहत होता. त्या दोघींशी त्याने लग्न केले होते.

कंकरखेडा पोलीस ठाण्यात नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केले, असा आरोप महिलेने केला आहे. महिलेनं एसएसपी कार्यालय गाठले. तिथे एसएसपींनी महिलेची तक्रार ऐकून घेतली आणि पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. महिलेने केलेले आरोप खरे आढळले, तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यासही त्यांनी सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka