Dailyhunt
महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणारा विकृत ताब्यात.

महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणारा विकृत ताब्यात.

मुंबई: मुंबईतील 25 महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणाऱ्या विकृताला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली असून आयटी अॅक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (वय 36, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वांद्रे येथील बेहरापाडा परिसरात पराठाचे दुकान चालवतो.

वांद्रे पूर्व येथील एका 30 वर्षीय गृहिणीला 14 जूनला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणारा व्यक्ती अश्लील संभाषण करू लागला. महिला दूरध्वनीवर त्याला ओरडली असता आरोपीने तिला अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवण्यास सुरूवात केली. त्यामुळे सदर महिला घाबरली. सुरूवातीला तिने दुर्लक्ष केले. पण आरोपी वारंवार त्रास देत असल्यामुळे तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले.

आरोपी विवाहीत असून त्याचा दोन मुले आहेत. मुंबईतील बेहरामपाडा परिसरात आरोपी भाडेतत्त्वाच्या घरात इतर मित्रासोबत राहतो. आरोपीने गुन्ह्यांसाठी आठ विविध मोबाईलचा वापर केल्याचे तपासत निष्पन्न झाले. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपी खानला शुक्रवारी सापळा रचून बेहरामपाडा परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यावेळी आरोपीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपीच्या मोबाईलच्या तपासणीत तो मुंबईतील 25 महिलांना अशा प्रकारे त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलांना आता पोलीस संपर्क साधून आरोपीविरोधात तक्रार करण्यास सांगितले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…

प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीची अत्याचार करून क्रूरपणे हत्या…

प्रेम, लव्ह मॅरेज अन् प्रेमसंबंध! दादर सूटकेस प्रकरणात पत्नीला अटक…

लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…

धक्कादायक Video: पहाटेच्या सुमारास महिलेला पाठीमागून येऊन मारली मिठी…

The post महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणारा विकृत ताब्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka